श्री
पावसाळ्यात वरुणराजाने आपली तिजोरी सताड उघडून आपल्या सहस्र हाताने पावसाचे धन पृथ्वीवर उधळले होते, कधी प्रसन्न होऊन, तर कधी क्रोधाने आपला तिसरा डोळा उघडलेल्या शंकरा सारखे तांडव करून आणी अशाच तांडवरुपी पावसात महाराज, बाजी प्रभू आणी ६०० मराठे ५-६ महिन्यापूर्वी पन्हाळ्याहून निसटले होते.
अशा संतत धारेने झोडपून काढल्याने सह्याद्री हिरवाकंच झाला होता.
पुण्याचा लालमहाल शाईस्ताखान व त्याच्या कुटुंबीयांनी व दास दासींनी तुडुंब भरला होता. उत्तर कोकण काबीज करण्याची महत्वाकांक्षा खानाला होती आणी ही जवाबदारी त्याने त्याच्या अत्यंत विश्वासू सरदार कहारतलबखानास दिली. कहारतलबखानाने तडक मोहिमेची तयारी सुरु केली. त्याने कछवाह, चौहान, अमरसिंह, मित्रसेन, सर्जेराव, रायबाघन, जसवंतराव कोकाटे, जाधवराव इ. मातब्बर सरदारांनी आपले सैन्य बळकट करण्यास सुरुवात केली आणी आपली फौज जवळ जवळ १०००० च्या घरात नेली.
यांच्यातील रायबाघन हि माहूरच्या उदाजीरामाची विधवा होती. १६५८ मध्ये उदाजीरामचा मृत्यू झाल्या नंतर तिने सरदारकीची सर्व धुरा आपल्या हातात घेतली व अत्यंत शूरपणे ती ते कार्य पार पाडत होती. तिच्यावर बेहद खुश होऊन बादशाह ने तिला रायबाघन हि खिताब बहाल केली होती.तिचे खरे नाव सावित्री होते.
अशी सर्व फौज घेऊन खान नागोठाणे, चौल, पनवेल, कल्याण व भिवंडी घशात घालण्यासाठी निघाला. तोफा, विविध रत्नांनी भरलेल्या संदुका, रायबाघन सारखे शूररत्न खानाकडे होते पण मात्र त्याने निवडलेली वाट अतिबिकट होती. त्या नागमोडी मार्गाने जातांना नागाचे पण काळीज हालाले असते.
१६६१ च्या पौष महिन्यातील दिवस ते. खानाने उत्तर कोकणात उतरण्यास सुरुवात केली ती लोहगडाच्या उत्तर-दक्षिण मार्गावरून. त्या चिंचोळ्या वाटेने जाणे शेषालाच काय पण पाण्याला पण कठीण. कसातरी हा मार्ग कापून ते सैन्य एका घनदाट जंगलात येऊन पोचले. सूर्यप्रकाशाची धरती वर पोचायची धडपड नुसती निष्फळ, एवढी घनदाट झाडी ती. उंबरखिंड म्हणून हा भाग ओळखला जाई. या मार्गाच्या पश्चिमेला उंबारे नावाचे गाव होते.
या गावातून सैन्य दक्षिण दिशेला वळले, एका पहाडाच्या पूर्व बाजूने या मार्गाचा दक्षिण मार्ग अडवला आणि आता सैन्य अशा एका ठिकाणी येऊन पोचले जिथे एक चिंचोळी वाट सोडली तर चारही बाजूने पहाडाने वेढा घातला होता. सैन्य जसे एका बंदुकीच्या नळीतून जावे असा काही भास होत होता.
हवेत गारवा होता, सैन्याच्या पायांचा आवाज, मधून कोणा घोड्याच्या व बैलाच्या पाठीवर फाट्ट करून उठणारा आसुडाचा आवाज, "आगे बढते रहो.." अशी एखाद्या सरदाराची आरोळी याशिवाय काहीच ऐकू येत नव्हते. झाडांच्या पानातून व गवतातून सळसळ-सळसळ असा एक भयंकर आवाज मधूनच येई. अशा या गूढ वातावरणाने त्या सैन्याच्या काळजाचा ठोका मधूनच चुकत होता. खानालाही पुढच्या पावलावर काहीतरी भयंकर गोष्ट आपली वाट पाहते आहे असं मधूनच वाटत होत. आणी रायबाघनला याची खात्री होती .
तेव्हड्यात एक सुईईई असा आवाज त्या भयाण शांततेत उठला आणि काही कळायच्या आत एका बाणाने एका सैनिकाच्या गळ्याचा वेध घेतला. तो बाण गळ्यात जाऊन मानेतून बाहेर आला आणि मग "कत्लेआम करो" हे वाक्य पुरे होण्याच्या आधी असंख्य बाणांचा वर्षाव त्या सैन्यावर झाला. जोरात वारा आल्याने झाडावरची जांभळं कशी टपाटप पडतात तसे खानाचे सैन्य पडू लागले.विस्फारलेल्या डोळ्याने खान हे अकस्मात आलेले वावटळ बघत होता. आपले सगळे बाळ एकवटून तो ओरडला,
"दुश्मन को काटो, कोई बचने ना पाए !!"
पण त्याच्या या एल्गाराला काहीच अर्थ नाही हे त्याचे त्याला लगेच कळलं, कारण "दुश्मन" कुठेच दिसत नव्हता. दिसत होते ते फक्त बाणाने वेध घेतलेले आपल्या सैनिकांचे मुडदे व भूत पहिल्या सारखे त्यांचे चेहरे.
आतापर्यंत शांत असलेल्या मुलुखात नुसता आक्रोश ऐकू येत होता. खानाने आणलेले उसने अवसान रायबाघनला कळत होते. घोड्यांच्या खिंकाळण्याने तर कधी माणसांच्या ओरडण्याने त्याचे ते अवसान खर्रकन उतरत असे. आपल्या सेनापतीला चारही बाजूनी मार खातांना पाहून रायबाघनला त्याची दया येत होती. शेवटी ना राहवून ती म्हणाली.
"खाँसाहब रोकिये ये सब, अगर ऐसेही चलता रहा तो कुछ लम्हो में यहाँ सिर्फ लाशे होगी।"
"हाम भी तो ये रोकना ही चाहते है, मगर कमबख्त ये दुश्मन कही दीखता भी नहीं ।
"खाँसाहब अब बचनेका सिर्फ एकहि रास्ता है, शिवजीराजा के सामने बिना कोई शर्त हथियार डालना ।
"याने हम हार कुबूल करे ?"
एक कुत्सित हास्य चेहऱ्यावर आणून ती बोलली "और हम कर भी क्या सकते है?"
"हाम भी तो ये रोकना ही चाहते है, मगर कमबख्त ये दुश्मन कही दीखता भी नहीं ।
"खाँसाहब अब बचनेका सिर्फ एकहि रास्ता है, शिवजीराजा के सामने बिना कोई शर्त हथियार डालना ।
"याने हम हार कुबूल करे ?"
एक कुत्सित हास्य चेहऱ्यावर आणून ती बोलली "और हम कर भी क्या सकते है?"
खानाने आपला एक जासूद आपल्या मजकुरासह व शरणागतीचा निशाणासह पाठवला. त्याला जरावेळाने काही मराठे एका झाडीत घेऊन गेले. बाणांचा वर्षाव सुरूच होता. खान डोळे लावून त्या झाडी कडे बघत होता. आणि त्याला तो जासूद झाडीतून परततांना दिसला. जासूदाने खानाला कुर्निसात करून संपूर्ण हवाला दिला.
"शिवजीराजा अपने तीरंदाजोको रोकने को तैयार है और हमे वह जिन्दा छोड़ने को भी तैयार है।
"मगर तीर तो चल ही रहे है?"
"शिवाजीराजा चाहता है आप खुद ये दरख्वास्त उनके सामने रखे। "
"मगर तीर तो चल ही रहे है?"
"शिवाजीराजा चाहता है आप खुद ये दरख्वास्त उनके सामने रखे। "
खानाने एक आवंढा गिळला आणि एक नजर रायबाघन कडे टाकली. तीने डोळ्यांच्या पापण्यांची उघडझाप पण न करता फक्त नजरेनेच होकार दिला. आणि त्या मराठ्यांसोबत आता खान त्या झाडीत जातांना दिसला.
चिलखत चढवलेल्या अश्वारूढ सैनिकांच्या हातात धनुष्य आणि पाठीस बाणांचा भाता होता. एक गोल वर्तुळ करून ते उभे होते. जसा खान आणि त्याच्या सोबतचे मराठे जवळ आले तसे समोरच्या दोन घोडेस्वारांची मधली जागा मोकळी करून ती कडी उघडली. त्या वर्तुळाच्या मधोमध एका काळ्याशार सुशोभित घोड्यावर शिवाजी महाराज बसले होते. त्यांच्या डोक्यावर शिरस्त्राण होते, त्याच्या लोखंडी साखळ्या खांद्यापर्यंत उतरल्या होत्या. त्यांनी अंगात चिलखत चढवले होते, उजव्या हातात एक लांब भाला होता, भाल्या भवती असलेल्या बोटांमध्ये हिऱ्या-मोत्यांच्या अंगठ्या होत्या. मनगटात जाडजूड सोन्याचे कडे होते. कमरेच्या सोनेरी पट्ट्यात, म्यानामध्ये 'भवानी' शोभत होती आणि त्या म्यानेचा ताबा डाव्या मुठीने घेतला होता. महाराजांच्या कपाळावर आडवे शिवगंध होते, काळीभोर दाढी हनुवटीवर निमुळती होऊन समोरच्या बाजूस वळली होती. काळ्याभोर दाढीवर ते गरुडासारखे नाक चेहऱ्यवरची जरब वाढवत होते. कपाळावरच्या शिवगंधाखालचे ते तेजस्वी डोळे खानावर स्थिरावले होते. हजार सूर्याचं तेज त्या डोळ्यात सामावलं होतं. त्या दोन डोळ्यात पाहण्याची कोणी हिम्मत केलीच तर जागीच भस्म होईल असा दाह त्यात होता. ओठांवर ना स्मित होतं, ना कपाळावर त्वेषाच्या आठ्या. चेहऱ्यवरचे भाव कसलाच ठाव घेऊ देत नव्हते. चेहऱ्याकडे पाहून मनात नेमके काय आहे हे सांगणे खुद्द परमेश्वराला पण अशक्यच. हिम्मत करून शेवटी खान बोलला
"हमारी गलती हो गयी राजाजी, यह गलती हुजूर शाइस्ताखानसाहब के कहने पर इस नाचीज को करनी पड़ी. आप हमपर रहम कीजिये. हमे लौटने की मंजूरी दे यह इस नाचीज की दरख्वास्त है. "
आपली नजर खानावरून ढळू न देता महाराज म्हणाले
"हमारा मुल्क और जिगर दोनों चट्टान का है। बड़े बड़े सुरमाओने इस मिटटी की धूल चखी है। किसीने पीठ पर वार खाये है तो किसीकी गर्दन कटी है। दोबारा ऐसी गलती का अंजाम कुछ और होगा ये ध्यान में रहे। "
आपली नजर खानावरून ढळू न देता महाराज म्हणाले
"हमारा मुल्क और जिगर दोनों चट्टान का है। बड़े बड़े सुरमाओने इस मिटटी की धूल चखी है। किसीने पीठ पर वार खाये है तो किसीकी गर्दन कटी है। दोबारा ऐसी गलती का अंजाम कुछ और होगा ये ध्यान में रहे। "
खानावरची नजर ना काढता महाराज आपल्या सरदाराला म्हणाले
"आक्रमण थांबवा. खान आणि त्याच्या सैन्याची शास्त्रे, दारुगोळा, जडजवाहीर, ऊंट, घोडे, बैलं जप्त करा व सरकारात जमा करा. वाचलेल्या फौजेला पाणी घेऊ द्या. जे रणांगणात पडले त्यांना परत घेऊन जाण्याची परवानगी द्या. कुणालाही बंदी करू नका आणि त्यांच्या सैन्यात रायबाघन नावाच्या स्त्री आहेत त्यांच्या जाण्याची विशेष सोय करा व आदराने पाठवा."
खानाला उद्देशून महाराज म्हणाले
"यह मुलाकात शाइस्ताखान को जरूर बताना। आप जा सकते हो । "
महाराजांना मुजरा करीत खान निघून गेला. बाणांचा वर्षाव आता पूर्ण थांबला होता. वादळ येऊन गेल्यावर शांतता कशी अजूनच कर्कश वाटते तशी ती खान व त्याच्या फौजेला वाटत होती. शाईस्ताखानाचे उत्तर कोकण काबीज करायच्या मनसुब्यांना सह्याद्रीच वादळ मानवाला नव्हत.